Samsung नं गेल्या आठवड्यात आपल्या ‘ए’ सीरिजमध्ये 5 स्मार्टफोन्स सादर केले होते. यात Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोनचा देखील समावेश होता. या डिवाइसच्या माध्यमातून पहिल्यांदाच 108MP कॅमेरा या सीरिजमध्ये आला आहे. परंतु लाँचच्या वेळी कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत मात्र सांगितली नव्हती. आता टेक वेबसाईट Pricebaba नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने या मोबाईलची किंमत लीक केली आहे.
Samsung Galaxy A73 5G ची भारतीय किंमत
Galaxy A73 स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट सादर केला जाईल. ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल असेल. यातील बेस व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये असेल. तर सॅमसंग गॅलेक्सी ए73 स्मार्टफोनच्या टॉप एन्ड व्हेरिएंटसाठी 44,999 रुपये मोजावे लागतील. लवकरच हा फोन प्री बुकिंगसाठी Samsung.com, प्रमुख रिटेल स्टोर आणि ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होईल.
Samsung Galaxy A73 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A73 5G मध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि Corning Gorilla Glass 5 सह येतो. यात Snapdragon 778G ची प्रोसेसिंग पवार आणि Adreno 642L GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज आहे. जी मायक्रो SD कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 12 बेस्ड OneUI 4.1 वर चालतो.
Samsung Galaxy A73 च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108MP चा मुख्य सेन्सर, 12MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 5MP ची मॅक्रो लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंटला एक 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये इन-डिस्प्ले सेन्सर देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP67 रेटिंग देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोनमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळते. परंतु कंपनी या फोनच्या बॉक्समध्ये चार्जर देणार नाही.
सॅमसंगचा हा फोन ऑसम मिंट, ऑसम ग्रे आणि ऑसम व्हाइट कलर ऑप्शनमध्ये आला आहे. यातील रॅम प्लस फिचरच्या मदतीनं फोनचा 16GB पर्यंत वाढवता येतो. सॅमसंगच्या फोनसोबत तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही. सॅमसंगच्या या फोनला चार वर्षापर्यंत ऑपरेटिंग सिस्टम अपडेट आणि पाच वर्ष सिक्योरिटी अपडेट देण्यात येतील.