Samsung Galaxy Tab A8 (2021) लवकरच बाजारात येणार आहे. हा कंपनीचा स्वस्त टॅबलेट असेल, जो UNISOC चिपसेटसह बाजारात येईल. आता या टॅबलेटच्या किंमतीची माहिती समोर आली आहे. लीकनुसार हा टॅब 32 जीबी, 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजसह बाजारात येईल. तर Wi-Fi only आणि Wi-Fi + LTE असे दोन व्हेरिएंट देखील कंपनी सादर करू शकते.
Samsung Galaxy Tab A8 (2021) ची लीक किंमत
Appuals नं दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy Tab A8 2021 च्या वाय-फाय व्हेरिएंटच्या 32 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 270 युरो (जवळपास 23,000 रुपये) असेल. तर 64 जीबी स्टोरेजची किंमत देखील 270 युरो (जवळपास 23,000 रुपये) असेल. मात्र 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 360 युरो (जवळपास 30,80 रुपये) मोजावे लागतील.
टॅबच्या Wi-Fi + LTE व्हेरिएंटच्या 32 जीबी स्टोरेजची किंमत 320 युरो (जवळपास 27,400 रुपये) असेल. तर 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 410 युरो (जवळपास 35,000 रुपये) असू शकते.
Samsung Galaxy Tab A8 (2021) चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
अनेक लिक्स आणि रिपोर्ट्समधून या टॅबच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. त्यानुसार यात 10.5 इंचाचा मोठा एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचे रिजोल्यूशन 2,000x1,200 पिक्सल असेल. हा टॅब Unisoc Tiger T618 प्रोसेसरसह बाजारात येईल. सॅमसंग या टॅबमध्ये 7,040 एमएएचची बॅटरी देऊ शकते, जी 15 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. आगामी सॅमसंग टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. तसेच यातील क्वॉड-स्पिकर सेटअपची माहिती देखील लीक झाली आहे.