Samsung Galaxy Book 2 Series चे लॅपटॉप भारतात लाँच झाले आहेत. कंपनीनं लेटेस्ट 12th जेनरेशनच्या Intel Core प्रोसेसरसह Galaxy Book 2 Pro, Galaxy Book 2 Pro 360, Galaxy Book 2 360, Galaxy Book 2 आणि Galaxy Book 2 Business लॅपटॉप सादर केले आहेत. सोबत Galaxy Book Go लॅपटॉपनं Qualcomm Snapdragon 7C Gen 2 Pro प्रोसेसरसह एंट्री घेतली आहे. जो AMOLED स्क्रीन आणि Wi-Fi 6E कनेक्टिव्हिटीसह सादर झाला आहे.
Galaxy Book 2 Series चे स्पेसिफिकेशन्स
या सीरीजचे सर्व लॅपटॉप AMOLED स्क्रीनसह येतात.Galaxy Book 2 Pro 360, Galaxy Book 2 Pro लॅपटॉप 13.3 इंच आणि 15.6 इंचाच्या दोन आकारात विकत घेता येतील. तर Galaxy Book 2 360 चा एकच 13.3 इंचाचा मॉडेल आहे. या सीरीजच्या लॅपटॉप मध्ये FHD+ रिजोल्यूशन असलेला वेब कॅमेरा मिळतो.
या सीरीजचे सर्व लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. तसेच यात 12th Gen Intel Core प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत DDR5 RAM सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 6E मिळतो. तसेच यात USB Type C चार्जिंग फीचर देण्यात आलं आहे.
किंमत
Samsung Galaxy Book 2 सीरीजच्या Book 2 Pro 360 मॉडेलची किंमत 1,15,990 रुपयांपासून सुरु होते. तर Galaxy Book 2 चा बेस मॉडेल 1,06,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy Book 2 360 ची आरंभिक किंमत 99,990 रुपये आहे. सर्वात छोटा Galaxy Book Go तुम्ही 38,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच Galaxy Book 2 च्या बेस मॉडेलसाठी 65,990 रुपये मोजावे लागतील. या सीरीजमधील Galaxy Book 2 Business ची किंमत 1,04,990 रुपये आहे. हे लॅपटॉप कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले आहेत. ज्यांच्या खरेदीवर सॅमसंग 5,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे.