Samsung लवकरच भारतात Galaxy F-सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने सांगितले आहे कि ते भारतात Galaxy F22 स्मार्टफोन लाँच करणार आहेत. यावर्षी सॅमसंगने F-सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने सांगितले आहे कि भारतात हा फोन 6 जुलैला लाँच झाल्यानंतर खरेदीसाठी Flipkart वर उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये केला जाऊ शकतो.
सॅमसंगने सांगितले आहे कि Samsung Galaxy F22 भारतात 6 जुलैला लाँच होईल. या लाँच डेटसोबतच कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स देखील जगासमोर आणले आहेत. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वरील लिस्टिंगमधून समजले आहे कि या फोनमध्ये 6,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल.
Samsung Galaxy F22 ची वैशिष्ट्ये
Samsung Galaxy F22 मध्ये 6.4-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल, हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. वाटरड्रॉप नॉचसह येणाऱ्या या सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळाले. या सेटअपमध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. या स्मार्टफोनमधील इतर कॅमेरा सेन्सरची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर असतील, अशी चर्चा आहे. Samsung चा हा स्मार्टफोन Google Play Console वर MediaTek Helio G80 SoC सह लिस्ट करण्यात आला होता. तसेच इथून 4GB रॅम आणि Android 11 आधारित OneUI 3.0 ची माहिती देखील मिळाली होती.