Samsung च्या काही स्मार्टफोन्स सध्या चर्चेत आहेत. कंपनी आपला सर्वात स्वस्त 5G देखील लाँच करणार आहे. हा फोन Galaxy A13 5G नावाने बाजारात येईल. तसेच आता अजून एका नवीन बजेट स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. हा नवीन सॅमसंग फोन Samsung Galaxy Wide5 नावाने गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे. मात्र हा फोन भारतात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
Samsung Galaxy Wide5 स्मार्टफोन भारतात रीब्रँड करून सादर केला जाईल, हा फोन भारतीय बाजारात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच होईल. गुगल प्ले कंसोलनुसार हा फोन MediaTek Dimensity 700 चिपसेटसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 6GB RAM मिळू शकतो, हा फोन अँड्रॉइड 11 ऑपेरेटिंग सिस्टमसह सादर केला जाईल. तसेच फोनमध्ये 1080x2009 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आणि माली जी57 जीपीयू देण्यात येईल.
आज आलेल्या Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सॅमसंग फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.