सप्टेंबरमध्ये सॅमसंगने Galaxy F42 हा 5G Phone भारतात लाँच केला होता. हा फोन कंपनीने 12 5G बँड्ससह सादर केला होता. या डिवाइसमध्ये 64MP कॅमेरा, 8GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5,000mAh बॅटरी असे दमदार स्पेक्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 23,999 रुपयांपासून सुरु होते. परंतु फ्लिपकार्टवर हा 5G Phone आता 6000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.
Samsung Galaxy F42 5G Discount offer
फ्लिपकार्ट सेलमध्ये या सॅमसंग फोनच्या दोन्ही रॅम व्हेरिएंटवर 6000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या फोनचा 6जीबी रॅमआणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट आता 23,999 रुपयांच्या ऐवजी 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच एसबीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येईल. त्याचबरोबर जुना फोन एक्सचेंज केल्यास 14,950 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळू शकते.
Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट असलेला हा एक टीएफटी पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा डायमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा सॅमसंग फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा 5G फोन अँड्रॉइड 11 ओएससह वनयुआयवर चालतो.
या लेटेस्ट सॅमसंग फोनमध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Wide5 5G मध्ये सिक्योरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.