सॅमसंगने काही महिन्यांपूर्वी आपल्या गॅलेक्सी एफ सीरिजमध्ये Samsung Galaxy F62 स्मार्टफोन लाँच केला होता. आता या स्मार्टफोनच्या किंमतीवर कंपनी 4,000 रुपयांची सूट देत आहे. ही सूट ऑफलाइन स्टोरमधून हा स्मार्टफोन विकत घेतल्यानंतर मिळवता येईल. ही एक पे आउट स्कीम आहे त्यामुळे यात मिळणारे फायदे दुकानदारांवर अवलंबून असतील. सॅमसंगने मात्र या फोनवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट निश्चित केला आहे.
नवीन किंमत
Samsung Galaxy F62 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB मेमरी 23,999 रुपयांच्या ऐवजी 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 25,999 रुपयांमध्ये लाँच झालेला 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 4,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ही ऑफर 13 जुलैपर्यंत सुरु राहील.
Samsung Galaxy F62 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F62 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचाच फ्लॅगशिप चिपसेट Exynos 9825 देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन 8GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते.
Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सलची वाईड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.