नवी दिल्ली - स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे. सॅमसंग लवकरच आपला फोल्डेबल फोन लाँच करत आहे. भारतात 1 ऑक्टोबर रोजी सॅमसंगचा Galaxy Fold लाँच होणार आहे. भारतातील ग्राहक अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहत होते. Galaxy Fold हा या आधीच लाँच होणार होता. मात्र यामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला नव्हता.
सॅमसंगच्या Galaxy Fold मध्ये डुअल डिस्प्ले असणार आहे. बाहेर 4.6 इंचाचा एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. तर आतील बाजुस 7.3-इंच QXGA+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. गॅलक्सी फोल्डमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. तसेच 7nm ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. मात्र अॅडिशनल मेमरी कार्डसाठी स्लॉट देण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनमध्ये दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत. ज्यांची एकूण क्षमता 4,380mAh आहे.
युजर्सना फोटोग्राफीसाठी गॅलक्सी फोल्डमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत. फोल्ड केल्यानंतर 10 मेगापिक्सलचा एक सेल्फी कॅमेरा आहे. तर पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये डुअल अपर्चरसोबत 12 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्स, टेलीफोटो लेन्स सोबत 12 मेगापिक्सल सेन्सर आणि 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तसेच इनर फ्लेक्झिबल स्क्रीनवर 10 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा ड्युएल कॅमेरा सेटअप आहे.
Samsung Galaxy Note 10, Note 10+ भारतात लाँचदक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात नोट सिरिजचे दोन फोन लाँच केले आहेत. या फोनचे नाव Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ असे असून बंगळुरूमध्ये हे फोन लाँच झाले. सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 मध्ये 1080x2280 पिक्सल रिझॉल्यूशनचा डायनॅमिक अॅमोल्ड पॅनलचा 6.3 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये सॅमसंगनेच विकसित केलेला ऑक्टा-कोर Exynos 9825 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेंस कॅमेरा असून 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 80 डिग्री व्ह्यू सोबर 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 3500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 69,999 रुपये असून नोट 10+ ची किंमत 79999 रुपये आणि 512जीबीची 89,999 रुपये एवढी आहे.