सॅमसंगने आपली परवडणारी स्मार्टफोन सिरिज जे, ऑन आणि सी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सॅममोबाईल नावाच्या वेबसाईटने दिली आहे. यामध्ये सॅमसंग नवीन M सिरिज सुरु करणार असल्याचेही म्हटले आहे.
सॅमसंगचे हे फोन बंद होणार असल्याने त्यांच्या किंमतीही कमी करण्यात येत आहेत. जुना स्टॉक संपविण्याकडे कंपनीचा कल राहणार आहे. यामुळे येत्या काळात या सिरिजच्या मोबाईलवर मोठी सूट पाहायला मिळाल्यास नवल वाटू नये.
सॅमसंगने विक्रेत्यांच्या विरोधामुळे जे सिरिज दुकानांमध्ये आणि ऑनलाईन विक्रीसाठी ऑन सिरिज काढली होती. नंतर जे सिरिज ऑनलाईनही विकली जाऊ लागली. या सिरिज बंद करून सॅमसंग एस सिरिजचे दोन मोबाईल काढण्याची शक्यता आहे. एम सिरिजचे पहिले मॉडेल SM-M205F असणार असून 32 आणि 64 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये येईल. तर दुसरे मॉडेल SM-M305F हे 64 आणि 128 जीबी स्टोरेजच्या पर्यायामध्ये येईल.
कंपनीचे प्रमुख डीजे कोह यांनी सप्टेंबरमध्ये एका मुलाखतीमध्ये याचे संकेत दिले आहेत. कंपनी एका नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. नवीन फिचर्सही आहेत. या नव्या फिचर्सना सॅमसंगच्या महागड्या स्मार्टफोनमध्ये देण्यात येणार नाही. यावरून कंपनी नवीन श्रेणी आणणार असल्याचे दिसत आहे.