शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Samsung Galaxy M22 वेबसाइटवर लिस्ट; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरसह घेणार एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: September 04, 2021 11:51 AM

Samsung Galaxy M22 listing: Samsung Russia च्या वेबसाइटवर गॅलेक्सी एम22 चे सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनी एखाद्या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी सपोर्ट पेज लाईव्ह करते, त्यामुळे या फोनचा लाँच समीप असल्याचे समजते.  

Samsung च्या एम सीरिजमधील आगामी स्मार्टफोनची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हा फोन SM-M225FV मॉडेल नंबरसह लीक झाला होता, मॉडेल नंबर वरून हा फोन Samsung Galaxy M22 नावाने मार्केट केला जाईल, असे अंदाज वर्तवण्यात आले होते. आता हाच सॅमसंगस्मार्टफोन रशियामध्ये कंपनीच्या वेबसाईटवर दिसला आहे. Samsung Russia च्या वेबसाइटवर गॅलेक्सी एम22 चे सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनी एखाद्या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी सपोर्ट पेज लाईव्ह करते, त्यामुळे या फोनचा लाँच समीप असल्याचे समजते.  

Samsung Galaxy M22 हा एक स्मार्टफोन एक ड्युअल सिम स्मार्टफोन असेल. कारण रशियन वेबसाइटवर हा फोन SM-M225FV/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या सपोर्ट पेजवरून इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. कंपनीने या स्मार्टफोनचा फोटो देखील अपलोड केलेला नाही. परंतु लवकरच हा फोन जागतिक बाजारात दाखल होईल आणि त्यानंतर हा भारतात सादर केला जाऊ शकतो.  

Samsung Galaxy M22 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

अधिकृतपणे सॅमसंग गॅलेक्सी एम22 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये लिस्टिंग्स आणि लीक्समधून या फोनची थोडी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 6.44 इंचाचा एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा इनफिनिटी ‘वी’ डिजाईनसह येणार डिस्प्ले असेल, जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कंपनी यात ऑक्टकोर प्रोसेसर आणि मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट  देऊ शकते. ग्राफिक्ससाठी यात माली जी52 जीपीयू मिळू शकतो.  

लिक्सनुसार या फोनमध्ये 4GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल, जी मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येईल. Galaxy M22 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 3 वर चालेल. या फोनमधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर,  8MP ची वाईड अँगल लेन्स, 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात येईल. हा फोन 13MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy M22 स्मार्टफोन 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड