Samsung नं गेल्यावर्षी भारतात Galaxy M32 स्मार्टफोन लाँच केला होता. फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी, मीडियाटेक हीलियो G80 SoC, AMOLED स्क्रीन आणि 64-मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. आता या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे. नव्या किंमतीसह हा हँडसेट कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे.
Galaxy M32 स्मार्टफोन भारतात 14,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. आता सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनच्या 4GB RAM वर 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये करण्यात आली आहे. तसेच अॅमेझॉनवर देखील हा डिवाइस 2000 रुपयांच्या प्राईस कटसह विकला जात आहे.
Samsung Galaxy M32 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. हा एक 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. हा अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित सॅमसंग वन युआयवर चालतो.
Samsung Galaxy M32 मध्ये Mediatek Helio G80 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी अश्या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या फोन्सची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 एमपीचा मुख्य कॅमेरा, 8 एमपीची अल्ट्रावाईड लेन्स, 2 एमपीची मॅक्रो लेन्स आणि 2 एमपीचाच डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
या ड्युअल सिम फोनमध्ये 4जी एलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.