Samsung भारतात स्मार्टफोन सादर करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या ए सीरिजमध्ये 5 स्मार्टफोन सादर करण्यात आले होते. तर आज एम सीरिजमध्ये Samsung Galaxy M33 5G नं एंट्री घेतली आहे. हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरी, 5nm प्रोसेसर, 8जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह बाजारात आला आहे.
Samsung Galaxy M33 5G ची किंमत Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनच्या 6GBरॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत किंमत 18999 रुपये आहे. तर टॉप एन्ड व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 20499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मोबाईल 8 एप्रिल दुपारी 12 वाजता कंपनीच्या वेबसाईटसह अॅमेझॉनवरून विकत घेता येईल.
Galaxy M33 5G Specificationsया फोनमध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला Gorilla Glass 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 5nm प्रोसेसरवर बनलेला ऑक्टाकोर Exynos प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. यातील व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 16GB पर्यंत रॅम मिळवता येतो.
Samsung Galaxy M33 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50MP चा सेन्सर आहे. सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला पावर देण्यासाठी 6000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.