Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनचे सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाईटवर लाईव्ह झाले आहे. या सपोर्ट पेजवरून हा स्मार्टफोन लवकरच देशात लाँच केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर गॅलेक्सी एम52 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-M526B/DS सह लिस्ट झाला आहे. हा मॉडेल नंबर ब्लूटूथ एसआईजीवरील SM-M526B_DS आणि SM-M526BR_DS मॉडेल नंबरशी मिळता जुळता आहे. या सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून सॅमसंग गॅलेक्सी एम52 च्या नावाची माहिती मिळाली होती.
Samsung Galaxy M52 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. इन्फिनिटी ‘ओ’ डिजाईनसह येणारा हा डिस्प्ले 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंगच्या वनयुआय 3.1 वर चालेल.
Samsung Galaxy M52 5G मध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन 1TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्ड सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमधील बॅटरी क्षमतेची माहिती मिळाली नाही. परंतु यात 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.