Samsung भारतातील आपला 5G स्मार्टफोन्सचा पोर्टफोलिओ वाढवण्याची चांगलीच तयारी करत आहे.. आजचा कंपनीचा Galaxy M32 5G अॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच आता Samsung Galaxy M52 5G आणि Galaxy F42 5G देखील भारतात लाँच होणार असल्याचे लीकमधून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी Galaxy M52 5G स्मार्टफोन BIS लिस्टिंगमध्ये दिसला होता.
टिप्सटर Debayan Roy ने सांगितले आहे कि, Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. तर Galaxy F42 5G स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये गॅलेक्सी एम52 5जी च्या आधी लाँच केला जाऊ शकतो. देब्यानने कोणतीही अचूक अशी लाँच डेट सांगितली नाही. परंतु जर हे फोन्स पुढल्या महिन्यात भारतात येणार असतील तर लवकरच सॅमसंग इंडियाकडून यांची अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.
Samsung Galaxy M52 5G चे लीक स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 4860mAh बॅटरी असू शकते, अशी माहिती 3C लिस्टिंगमधून मिळाली होती. जिथे हा फोन EB-BM526ABY मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. ही बॅटरी 15W किंवा 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. Galaxy M52 5G च्या Geekbench च्य लिस्टिंगमधून 6GB रॅमची माहिती समोर आली आहे. हा सॅमसंग फोन Qualcomm Snapdragon 778G SoC आणि Adreno 642L GPU सह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन Android 11 आधारित सॅमसंगच्या OneUI 3.0 वर चालेल. Galaxy M52 5G चे स्पेक्स पाहता हा चीनमधील Galaxy F52 5G रिब्रँड व्हर्जन असू शकतो, अशी चर्चा आहे.