सॅमसंगने भारतात नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. जागतिक बाजारात सादर झाल्यानंतर Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन आता भारतीयांच्या भेटीला आला आहे. हा 5G डिवाइस 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अशा शानदार स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.
Samsung Galaxy M52 ची किंमत आणि ऑफर
Samsung Galaxy M52 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. हा मोबाईल 3 ऑक्टोबरपासून अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. सॅमसंगच्या या फोनवर अॅमेझॉन एक हजार रुपयांचा कुपन डिस्काउंट देखील देणार आहे. तसेच HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल.
Samsung Galaxy M52 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी M52 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या सुपर अॅमोलेड डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरचा वापर कंपनीने केला आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 पिगापिक्सलचा फ्रंट आहे. हा डिवाइस 25W फास्ट-चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. सिक्योरिटीसाठी या 5G फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर कनेक्टिविटीसाठी हँडसेटमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी, 5जी आणि टाइप-सी पोर्ट असे पर्याय उपलब्ध आहेत.