गेल्या महिन्यात सॅमसंगने Galaxy M52 हा 5G Phone लाँच केला होता. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G चिपसेट, 8GB RAM, 64MP Rear आणि 32MP Selfie Camera असे भन्नाट फिचर देण्यात आले होते. या फोनची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होते. परंतु आता दिवाळीच्या आधी कंपनी या फोनवर डिस्काउंट देत आहे. आजपासून Samsung Galaxy M52 5G Phone थेट 5000रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.
Samsung Galaxy M52 5G Discount offer
Samsung Galaxy M52 5G Phone वर मिळणार 5000 रुपयांचा डिस्काउंट फक्त ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. तसेच हा डिस्काउंट 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान उपलब्ध असेल. त्यामुळे या फोनचा 29,999 रुपयांमध्ये मिळणार 6GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Samsung Galaxy M52 5G चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसाठी 31,999 रुपयांच्या ऐवजी 26,999 रुपये मोजावे लागतील.
Samsung Galaxy M52 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी M52 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या सुपर अॅमोलेड डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरचा वापर कंपनीने केला आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 पिगापिक्सलचा फ्रंट आहे. हा डिवाइस 25W फास्ट-चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. सिक्योरिटीसाठी या 5G फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर कनेक्टिविटीसाठी हँडसेटमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी, 5जी आणि टाइप-सी पोर्ट असे पर्याय उपलब्ध आहेत.