Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लाँच झाला आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात मिळणारा 108MP चा कॅमेरा, जो जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा सेन्सर आहे. आजपासून हा डिवाइस देशात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याची विक्री ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमातून देखील करण्यात येत आहे. यावरील ऑफर्सचा फायदा घेऊन 27 हजारांच्या ऐवजी 14 हजारांच्या आत खरेदी करता येईल.
किंमत आणि ऑफर्स
Galaxy M53 5G आजपासून कंपनीच्या वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी चे दोन स्टोरेज व्हेरिएंट आहेत. यातील 6GB/128GB मॉडेलची किंमत 26,499 रुपये आणि 8GB/128GB मॉडेलची किंमत 28,499 रुपये आहे.
हा फोन आयसीआयसीआय बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 10,400 रुपयांची बचत देखील करू शकता. म्हणजे Galaxy M53 5G चा 6GB/128GB मॉडेल फक्त 13,599 रुपये खर्चून तुमच्या हातात येईल.
Samsung Galaxy M53 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आह, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पंच होल डिजाईनसह यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.2 वर चालतो. आहे. यात MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि Mali-G68 MP4 GPU मिळतो. सोबत एक्सपांडेबल रॅम फिचर देण्यात आलं आहे.
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108MP चा आहे, सोबत 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स, 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.