Samsung नं आपल्या होम मार्केट दक्षिण कोरियामध्ये Samsung Galaxy S20 FE 2022 नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी आलेल्या Samsung Galaxy S20 Fan Edition स्मार्टफोनचा नवीन व्हर्जन आहे. नवीन फोनचे स्पेक्स देखील जुन्या फोनच्या 4G व्हर्जन सारखे आहेत. म्हणूनच कदाचित कंपनीनं या फोनचा कोणताही गाजावाजा केला नाही.
Samsung Galaxy S20 FE 2022 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S20 FE मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्लेसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोनमध्ये सेल्फीसाठी पंच होल कटआउट आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 6GB रॅमसह येतो. या स्मार्टफोनची 128GB इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन अँड्रॉइड आधारित OneUI वर चालतो. Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन IP68 रेटिंग सह येतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळते. सेल्फीसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन आयपी68 रेटिंगसह बाजारात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते जी 25W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
Samsung Galaxy S20 FE 2022 ची किंमत
Samsung Galaxy S20 FE 2022 चा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल दक्षिण कोरियामध्ये KRW 700,000 मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत 43,500 भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. हा मोबाईल Cloud White, Cloud Lavender आणि Cloud Navy कलरमध्ये विकत घेता येईल.