Samsung ही कंपनी १४ जानेवारीला आपला नवा फ्लॅगशिप फोन लाँच करणार आहे. तसंच अनेक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या इव्हेंटमध्ये कंपनी Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra 5G हे फोन्स लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून समोर येत असलेल्या माहितीदरम्यानच WinFuture.de च्या रिपोर्टमध्ये या मोबाईलचं पॅकेजिंग कसं असेल याबाबत सांगण्यात आलं आहे. यापूर्वी Apple ने देखील आपल्या नव्या फोनसह चार्जर आणि ईयरफोन देणं केलं होतं बंद.रोलँड क्वॉन्टच्या (@rquandt) रिपोर्टमध्ये दोन ईमेजेस दाखवण्यात आल्या आहेत. तसंच Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra 5G च्या रिटेल बॉक्सच्या त्या ईमेज असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही बॉक्सचा कलर काळ्या रंगाचा आहे. तसंच याव्यतिरिक्त बॉक्स कंटेंट असलेल्या मार्केटिंग पोस्टरमध्ये यात मोबाईलसोबत काय काय मिळणार हे दाखवण्यात आलं आहे. यानुसार बॉक्समध्ये केवळ स्टार्ट गाईड, युएसबी सी केबल आणि एक सीम इजेक्टर टुल मिळणार आहे.
सॅमसंगचं Apple च्या पावलावर पाऊल; फ्लॅगशिप फोन्समध्ये ना चार्जर, ना ईयरफोन्स?
By जयदीप दाभोळकर | Published: January 13, 2021 4:29 PM
यापूर्वी Apple या कंपनीनंही आपल्या नव्या फोनसह चार्जर ईयरफोन देणं केलं होतं बंद
ठळक मुद्देसॅमसंगचे नवे फ्लॅगशिप फोन उद्या होणार लाँच