सॅमसंग सध्या आपल्या फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 वर काम करत आहे. ही सीरिज पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला लाँच होईल. परंतु आतापासूनच या स्मार्टफोन्सशी निगडित लीक येण्यास सुरुवात झाली आहे. आता एका ताज्या लीक रिपोर्टमध्ये सॅमसंगच्या आगामी Galaxy S22 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध टिप्सटर FrontTron ने प्रिमीयम Galaxy S22 स्मार्टफोनची माहिती ट्विटच्या माध्यमातून शेयर केली आहे. सॅमसंगच्या आगामी फोन Galaxy S22 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. या मुख्य कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा मिळेल, हा टेलीफोटो कॅमेरा 3X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. हाच कॅमेरा सेटअप Galaxy S22+ स्मार्टफोनमध्ये देखील मिळू शकतो.
विशेष म्हणजे याआधी सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये 100 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप दिला होता. त्यामुळे इतर कंपन्या 100 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स लाँच करत असताना दिग्गज कंपनी असे पाऊल उचलत आहे, हे अविश्वसनीय आहे. कदाचित आकड्यांच्या शर्यतीतून बाहेर पडून गुणवत्तेवर भर देण्याचा विचार कंपनी करत असावी. किंवा यापेक्षा अॅडव्हान्स मॉडेल्समध्ये कंपनी मोठा कॅमेरा प्रीमियम फिचर म्हणून देऊ शकते.