Samsung नं गेल्या आठवड्यात आपली नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 Series जागतिक बाजारात उतरवली होती. या सीरिजमध्ये Samsung Galaxy S22, Samsung Galaxy S22+ आणि Samsung Galaxy S22 Ultra अशा तीन फोन्सचा समावेश आहे. आता रिपोर्टमधून या सीरीजची भारतीय किंमत समोर आली आहे.
Samsung Galaxy S22 Series Price in India
मीडिया रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S22 Series ची किंमत 75000 रुपयांपासून सुरु होईल. तर टॉप मॉडेलची किंमत 1,10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं भारतात ही सीरिज प्री-ऑर्डरसाठी सादर केली होत. तुम्हाला या सीरिज मधील फोन्स विकत घ्यायचे असतील तर तुम्ही फक्त 1999 रुपयांमध्ये ही सीरीज प्री-ऑर्डर करू शकता. ही सीरिज मार्चमध्ये भारतीयांना विकत घेता येऊ शकते.
Samsung Galaxy S22 Series चे स्पेसिफिकेशन
Samsung पहिल्यांदाच भारतात Snapdragon प्रोसेसरसह Galaxy S Series चे स्मार्टफोन सादर करणार आहे. याची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. त्यामुळे Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra मध्ये Exynos 2200 प्रोसेसरच्या ऐवजी Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. यात Android 12 बेस्ड OneUI 4.0 मिळेल.
रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ हे दोन फोन्स 8GB/128GB आणि 8GB/256GB या दोन स्टोरेज मॉडेलसह येतील. तसेच दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतील. तर Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 12GB RAM सह 256GB आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन भारतात Phantom Black आणि Phantom White कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.
हे देखील वाचा: