Samsung Galaxy Unpacked 2022 इव्हेंटची तारीख लीक झाली आहे. या इव्हेंटमधून सॅमसंग आपली आगामी Galaxy S22 सीरिज सादर करणार आहे. लीक पोस्टरनुसार हा इव्हेंट पुढील महिन्यात अर्थात फेब्रुवारी 2022 मध्ये 9 तारखेला आयोजित केला जाईल. या इव्हेंटमधून येणारे स्मार्टफोन्स कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन्स असतील.
लोकप्रिय टिपस्टर इवान ब्लासनं एक पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरसोबत Samsung Galaxy S22 सीरिजची लाँच डेट समोर आली आहे. या पोस्टरसह Galaxy Unpacked 2022 इव्हेंट 9 फेब्रुवारी 2022 आयोजित करण्यात येईल. यावर्षीची संपूर्ण लाईनअप एस पेन सपोर्टसह सादर करण्यात येऊ शकते, असं सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
Samsung Galaxy S22 Series
मीडिया रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S22 सीरीजमध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra असे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. या सीरीजची डिजाइन जुन्या Galaxy S21 सीरीजसारखी असू शकते. Galaxy S22 Ultra मध्ये क्वॉड रियर कॅमेरा असलेली डिजाइन मिळेल. अन्य दोन फोन्स ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येऊ शकतात.
Galaxy S22 Ultra हा फोन कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 5000mAh ची बॅटरी आणि नवीन Exynos 2200 SoC सह येऊ शकतो. काही ठिकाणी हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 सह येईल. Galaxy S22 Ultra च्या मागे 108MP चा प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. सोबत 12MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर, 10MP चा 10x टेलीफोटो सेन्सर आणि 10MP चा 3x टेलीफोटो कॅमेरा मिळेल. अन्य दोन डिवाइसेज 50MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह येऊ शकतात.
हे देखील वाचा: