फोल्डबल फोन्स सादर केल्यानंतर आता Samsung आपल्या फ्लॅगशिप Galaxy S22 series कडे लक्ष देत आहे. ही सीरिज फेब्रुवारी 2022 मध्ये लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra असे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. यातील स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी 3C सर्टिफिकेशन्सवर दिसला होता.
3C सर्टिफिकेशन्स साईटनुसार हे तिन्ही फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतील. परंतु टिपस्टर आईस युनिव्हर्सने दिलेल्या माहितीनुसार या सीरिजमधील हायएंड व्हेरिएंट म्हणजे Galaxy S22 Ultra स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असेल. हा फोन 70 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 35 मिनिटे लागतील. तसेच हा फोन कंपनी 6.8-इंचाच्या 2K AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. जो 1800 निट्स ब्राईटनेस आणि हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
याआधी आलेल्या लीक रेंडर्सनुसार हा फोन पंच होल डिजाईनवर लाँच केला जाईल. तसेच यात Android 12 आधारित One UI 4 देण्यात येईल. फोटोग्राफीसती आगामी सॅमसंग फ्लॅगशिप फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यातील मुख्य प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. तसेच Galaxy S22 सीरीज Snapdragon 898 SoC सह सादर केली जाऊ शकते.