Samsung नं 2022 मध्ये Samsung Galaxy Note लाइनअप सादर करणार नाही, अशी माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. परंतु आता नव्या लीकनुसार, संपूर्ण लाईनअप नसली तरी नवीन नोट डिवाइस सादर करू शकते. हा स्मार्टफोन Samsung Galaxy S22 Series अंतर्गत सादर केला जाईल. या फोन सीरिजमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनची जागा घेईल.
टिपस्टर Frontron नं दिलेल्या माहितीनुसार, नवीन Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनच Galaxy S22 Note नावानं बाजारात येईल. हा या सीरीजमधील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असेल, तसेच या फोनचा डिस्प्ले देखील मोठा असेल. Galaxy S22 सीरिजमध्ये एस पेन सपोर्ट मिळणार असल्याची बातमी याआधीच आली होती त्यामुळे सॅमसंग आपल्या नोट स्टाईलची साथ एवढ्या लवकरच सोडणार नाही असं दिसतंय.
Samsung Galaxy S22 Note
वर सांगितल्यारप्रमाणे, Galaxy S22 Ultra यावर्षी S Pen सपोर्टसह येऊ शकतो. या स्टाइलससाठी फोनमध्ये एक स्लॉट मिळेल, यामुळे हा फोन Samsung Galaxy S22 Note नावानं बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फोन Samsung Galaxy S22 सीरीज अंतर्गत 2022 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. लिक्सनुसार कंपनी 8 फेब्रुवारी, 2022 ला ही सीरिज सादर करेल
या सीरीज अंतगर्त Galaxy S22, Galaxy S22 Plus आणि Galaxy S22 Note असे तीन फोन येतील. ज्यात Exynos 2200 चिपसेट किंवा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळू शकतो. या सीरीजच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह 2 टेलीफोटो लेन्स मिळू शकते.