सॅमसंग गॅलेक्सी एस ७ हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ४८,९०० रूपयात भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आला होता. याच्या मूल्यात दोनदा कपात करण्यात आली होती. यानंतर आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ३३,४९० रूपयात मिळत आहे. यासोबत फ्लिपकार्टने काही ऑफरदेखील देऊ केल्या आहेत. यात विना व्याजी इएमआयचा समावेश आहे. तर या मॉडेलसाठी एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर मात्र हे मॉडेल ३६,५९९ रूपयातच उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस ७ या मॉडेलमध्ये ५.१० इंच आकारमानाचा आणि क्युएचडी अर्थात १४४० बाय २५६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात सॅमसंगचाच १.६ गेगाहर्टझ एक्झीनॉक्स प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी देण्यात आले आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते २०० जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील मुख्य कॅमेरा १२ तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी एस ७ हे मॉडेल अँड्रॉईड ६.० अर्थात मार्शमॅलो या प्रणालीवर चालणारे आहे. यात थ्री-जी व फोर-जी नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स देण्यात आले आहेत. उर्वरित फिचर्समध्ये ऍक्सलोमीटर, गायरोस्कोप, कंपास, प्रॉक्झीमिटी सेन्सर आणि अँबिअंट लाईट आदींचा समावेश आहे. तर यात दोन जीएसएम सीमकार्डचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.