Samsung लवकरच भारतात दोन नवीन टॅबलेट्स लाँच करू शकते. हे टॅबलेट्स Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite नावाने सादर केले जातील. कंपनी हे डिवाइस देशात 18 जूनला लाँच करेल आणि हे दोन्ही टॅबलेट्स 23 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Samsung Galaxy Tab A7 Lite आणि Galaxy Tab S7 FE ची किंमत
Samsung Galaxy Tab A7 Lite ची किंमत भारतात 14,999 रुपयांच्या आसपास असेल, अशी माहिती 91mobiles ने दिली आहे. तर, Galaxy Tab S7 FE चा 4GB/64GB स्टोरेज व्हेरिएंट 46,999 रुपये आणि 6GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट 50,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy Tab S7 FE चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Tab S7 FE मध्ये 2,560×1,600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 12.4 इंचाचा WQXGA TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅबलेट Snapdragon 750G प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येईल. हि स्टोरेज माइक्रो SD कार्डने वाढवता येईल. या टॅबमध्ये 8MP चा सिंगल रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा असेल. या Android 11 वर चालणाऱ्या या टॅबलेटसोबत S Pen मिळेल. यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 10,090mAh ची मोठी बॅटरी मिळेल.
Samsung Galaxy Tab A7 Lite चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Tab A7 Lite मध्ये Android 11 चा सपोर्ट देण्यात येईल. तसेच, 1,340×800 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 8.7 इंचाचा डिस्प्ले या टॅबमध्ये देण्यात येईल. या टॅबमध्ये Helio P22T चिपसेट, 6GB पर्यंत RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच,या टॅबलेटमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 2MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. या टॅबमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात येईल.