Samsung Galaxy Tab S8 सीरीजमधील शक्तिशाली Galaxy Tab S8 Ultra चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक झाले आहेत. या लीकमधून टॅबच्या डिस्प्ले आणि बॅटरी क्षमतेची माहिती समोर आली आहे. लवकरच कंपनी आपल्या या टॅब सीरीजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Samsung Galaxy Tab S8+ आणि Samsung Galaxy Tab S8 असे तीन टॅबलेट सादर करू शकते.
प्रसिद्ध टिप्सटर Ice Universe ने ट्विटरच्या माध्यमातून Samsung Galaxy Tab S8 Ultra च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. या माहितीनुसार या टॅबमध्ये 14.6 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिजोल्यूशन 2960×1848 पिक्सल असेल. तसेच या टॅबमध्ये 11,500 एमएएच अवाढव्य बॅटरी दिली जाऊ शकते. जुन्या लिक्सनुसार ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.
Samsung Galaxy Tab S8 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Samsung Galaxy Tab S8 Ultra मध्ये 14.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा एक OLED पॅनल असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो. टॅबलेट 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह बाजारात येईल. फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असे दोन रियर कॅमेरे दिले जाऊ शकतात. फ्रंटला देखील कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
या टॅबलेटच्या वाय-फाय मॉडेलची किंमत KRW 1,469,000 (जवळपास 95,500 रुपये) असू शकते. तर इसका एलटीई व्हेरिएंटसाठी KRW 1,569,000 (जवळपास 1.02 लाख रुपये) मोजावे लागू शकतात. या टॅबचा एक 5G व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतो. ज्याची किंमत कंपनी KRW 1,669,000 (जवळपास 1.08 लाख रुपये) ठेऊ शकते.