सॅमसंगने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत “Galaxy Unpacked Part 2” इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट 20 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमधून कोणते प्रोडक्ट बाजारात येतील याची माहिती मात्र सॅमसंगने अजूनतरी सांगितलेली नाही. विशेष म्हणजे 18 तारखेला Apple तर 19 तारखेला Google ने लाँच इव्हेंटचे आयोजन केले आहे.
काही दिवसांपूर्वी टिपस्टर Jon Prosser ने Samsung Galaxy S21 FE च्या लाँच डेटची माहिती दिली होती. या लीकनुसार हा फोन ऑक्टोबरला प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. त्यांनतर आठवड्यानंतर 29 तारखेला हा फोन विकत घेता येईल. कदाचित 20 ऑक्टोबरच्या Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटमधून Samsung Galaxy S21 FE सादर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी या फोनचे सपोर्ट पेज देखील सॅमसंग जर्मनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले होते.
Samsung Galaxy S21 FE
लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा पंच होल डिजाईन असलेला अॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट मिळू शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 660 जीपीयू मिळेल. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. यात अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वन युआय 3.1.1 मिळेल. सिक्योरिटीसाठी डिवाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी Samsung Galaxy S21 FE मध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.