Samsung च्या वार्षिक Galaxy Unpacked इव्हेंटचे आयोजन यावर्षी 11 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. याची माहिती कालच कंपनीने दिली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, Galaxy Watch 4 आणि Galaxy Buds हे प्रॉडक्ट लाँच करू शकते. गेल्या काही महिन्यांपासून या सर्व प्रॉडक्ट्सची माहिती लिक्स आणि अफवांमधून समोर आली आहे. परंतु आता प्रथमच एका नवीन डिवाइसची माहिती समोर आली आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग Galaxy Flip 3 सोबत 11 ऑगस्ट रोजी Galaxy Z Flip 3 Lite देखील लाँच करू शकते. (Samsung Galaxy Z Flip 3 Lite 11 August launch rumors)
Samsung 11 ऑगस्टला Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, आणि Galaxy Z Flip 3 Lite हे तीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी माहिती Korea Herald ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. Galaxy Z Flip 3 Lite स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत सादर केला जाईल, असा दावा देखील या पब्लिकेशनने केला आहे. यापूर्वीही सॅमसंगच्या चार फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे ही बातमी खरी असू शकते. परंतु सॅमसंगने अजूनतरी याबात कोणतीही अधिकृत माहित दिली नाही. त्यामुळे ठोस माहितीसाठी 11 ऑगस्टची वाट बघावी लागेल.
Samsung Galaxy Z Flip 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ फोल्डेबल अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या मागे असलेले एक्सटर्नल डिस्प्ले आधीच्या तुलनेत मोठा असेल. यावेळी हा डिस्प्ले 1.9-इंचाचा असेल. या स्मार्टफोनच्या रेंडरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. परंतु कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली नाही.
जुन्या Galaxy Z Flip 2 प्रमाणे यात पावर बटण, वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येतील. Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे. Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत 1,400 डॉलर (अंदाजे 1,04,100 रुपये) असू शकते.