Samsung ने काही दिवसांपूर्वी आपले फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 3 आणि Z Flip 3 लाँच केले आहेत. लेटेस्ट डिस्प्ले टेक्नॉलॉजी आणि प्रीमिमय हार्डवेयरमुळे अनेकांनी या स्मार्टफोन्सचे कौतुक केले आहे. यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Z Fold 3 मध्ये कंपनीने अंडर-डिस्प्ले कॅमेरा (UDC) दिला आहे. हा फक्त एक 4MP चा कॅमेरा आहे, जो व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरला जातो. आता Samsung हे फिचर आगामी फोल्डेबल फोनमध्ये देणार असल्याची बातमी आली आहे.
सॅमसंग आपल्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्याची परफॉर्मन्स सुधारत आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy Z Fold 4 स्मार्टफोनमध्ये दोन UDC मॉडेल मिळतील. टिपस्टर Tron च्या ब्लॉगमध्ये आगामी Galaxy Z Flip 4 आणि Samsung Galaxy Z Fold 4 ची माहिती देण्यात आली आहे.
Samsung Galaxy Z Fold 4
Samsung Galaxy Z Fold 4 पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. या फोनच्या लाँचला बराच कालावधी शिल्लक आहे. पंरतु आतापासून या फोनच्या स्पेक्सची माहिती मिळाली आहे. टिपस्टर ट्रॉनने आपल्या ब्लॉगमध्ये सॅमसंगच्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनची माहिती शेयर केली आहे. त्यानुसार Galaxy Z Fold 4 स्मार्टफोनमध्ये सुधारित अंडर डिस्प्ले कॅमेरा मिळेल. तसेच सॅमसंग या टेक्नॉलॉजीचा वापर दोन्ही डिस्प्ले मध्ये करू शकते. या फोन्सच्या हिंजमध्ये देखील मोठा सुधार बघायला मिळेल. कमी वजन आणि डस्ट अँड वॉटर रेजिस्टन्सवर देखील भर देण्यात येईल.
Samsung Galaxy Z Flip 4
Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनमध्ये देखील अंडर डिस्प्ले कॅमेरा मिळू शकतो. सॅमसंगने Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनचे पंच होल आणि अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेले दोन प्रोटोटाइप तयार केले आहेत. यापैकी कोणत्या डिजाईनसह फोन येईल हे मात्र अजूनही ठरले नाही.