Samsung ने गेल्या आठवड्यात Galaxy Unpacked नावाच्या इव्हेंटच्या माध्यमातून आपले दोन फोल्डेबल फोन सादर केले होते. कंपनीने Samsung Galaxy Z Fold3 5G आणि Galaxy Z Flip 3 5G असे दोन फोन भारतासह जगभरात लाँच केले होते. लाँचच्या वेळी कंपनीने या स्मार्टफोन्सच्या युरोपियन किंमतीची घोषणा केली होती, परंतु भारतीय किंमतीचा उल्लेख केला नव्हता. आज सॅमसंग इंडियाने हे दोन्ही अनोख्या स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन्स येत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील आणि 10 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.
Samsung Galaxy Z Fold3 5G ची किंमत आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 3 5जी फोनचे दोन व्हेरिएंट्स भारतात लाँच केला गेला आहे. फोनचा छोटा 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1,49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर या फोनचा 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 1,57,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड3 5जी फोन को भारतीय बाजारात Phantom Black आणि Phantom Green कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनच्या प्री-बुकिंगवर कंपनी 7,999 रुपयांचा सॅमसंग केयर+ अॅक्सिडेंटल अँड लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन देण्यात येईल.
Samsung Galaxy Z Fold3 5G च्या माहितीसाठी इथे क्लिक करा
Samsung Galaxy Z Flip 3 5G ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy Z Flip 3 5G देखील दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मॉडेल 84,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 88,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा सॅमसंग फोल्डेबल फोन Phantom Black आणि Cream कलरमध्ये भारतात उपलब्ध झाला आहे. तसेच Samsung Galaxy Z Flip3 5G फोनच्या प्री-बुकिंगवर 4,799 रुपयांचे प्रोटेक्शन देण्यात येत आहे.
Samsung Galaxy Z Flip 3 5G च्या माहितीसाठी इथे क्लिक करा
हे दोन्ही स्मार्टफोन्स येत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील आणि 10 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. खरेदी करताना एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास 7,000 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. तसेच ग्राहकांना Galaxy SmartTag देखील मोफत देण्यात येईल.