सॅमसंगचे चहूबाजूंनी कौतुक होत आहे कारण कंपनीच्या नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 असे दोन स्मार्टफोन सादर केले होते. परंतु यातील एक फोल्डेबल फोन Galaxy Note 7 प्रमाणे चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आला आहे. कंपनीचा महागडा फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy Z Fold3 मध्ये स्फोट (Smartphone Blast) झाला आहे.
Samsung Galaxy Z Fold3 मध्ये स्फोट झाल्याची माहिती एका ट्विटर युजरने दिली आहे. ही घटना विदेशात घडली आहे. युजरने या घटनेचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड3 मध्ये जमिनीवर पडला आहे आणि त्यातून धूर निघत असल्याचे दिसत आहे. Samsung Galaxy Z Fold3 च्या स्फोटामुळे कोणतेही मोठे नुकसान किंवा दुखापत झाली नाही, असे देखील युजरने सांगितले आहे.
Samsung Galaxy Z Fold3 Blast
Chad Christian या अमेरिकन नागरिकांच्या सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड3 मध्ये आग लागली आहे. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी बाईकवरून पडल्यामुळे बंद पडला होता. तेव्हा रिपेयरिंगसाठी सर्व्हिस सेंटरवर गेल्यावर सेंटरने हा फोन रिप्लेस केला जाईल असे सांगितले. त्यासाठी हा फोन पॅक करून पाठवण्यास सांगण्यात आले.
जेव्हा चॅडने आपला फोन सर्व्हिस सेंटर पाठवण्यासाठी बॉक्समध्ये पॅक करत होता तेव्हा या फोनमधून धूर येऊ लागला आणि फोन गरम झाला होता. चॅडने हा फोन बाईकवरून पडल्यामुळे ब्लास्ट झाला असेल अशी शक्यता देखील ट्विटमध्ये वर्तवली आहे. तसेच हा अपघात Samsung Galaxy Note 7 सारखा वाटत नाही, असे देखील त्याने म्हटले आहे.