Samsung लवकरच आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज सादर करणार आहे. ही सीरिज Samsung Galaxy S22 नावानं बाजारात येईल. त्याआधी कंपनीनं यावर्षी सादर केलेल्या ‘गॅलेक्सी एस21 सीरीज’ वर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. या सीरीजमधील Samsung Galaxy 21 आणि Samsung Galaxy S21+ या 5G Phones वर थेट 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही ऑफर 8 ते 22 डिसेंबर दरम्यान वैध असेल.
या ऑफर अंतर्गत Samsung Galaxy S21 चा 128GB व्हेरिएंट 54,999 रुपयांच्या ऐवजी 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 256GB मॉडेलसाठी 53,999 रुपये मोजावे लागतील. Samsung Galaxy S21 Plus ची किंमत 71,999 रुपयांपासून सुरु होते. परंतु ऑफर अंतगर्त हा फोन 66,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Samsung Galaxy S21 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S21 मध्ये 6.2 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड 2एक्स इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Galaxy S21+ स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड 2एक्स डिस्प्ले आहे. दोन्ही फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. या फोन्सना एक्सनॉस 2100 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. हे स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतात.
फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी टेलीफोटो लेन्स, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 10 मेगापिक्सलच्या ड्युअल पिक्सल सेन्सरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Samsung Galaxy S21 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी आहे तर Samsung Galaxy S21+ मध्ये 4,800एमएएचची बॅटरी मिळते.