Samsung, Xiaomi, Oppo आणि Vivo मध्ये किती मोठी स्पर्धा आहे हे जगजाहीर आहे, परंतु एका खास सुविधेसाठी या मोठ्या अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. या कंपन्यांनी मोबाईल टू मोबाईल हाय स्पीड फाईल शेयरिंगसाठी हात मिळवणी केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये Oppo, Vivo आणि Xiaomi ने पियर टू पियर ट्रांसमीशन अलाइंस बनवली होती, ज्यात त्यांनी फाईल शेयरिंगसाठी ग्लोबल प्रोटोकॉल बनवण्याचा मुद्दा प्रस्तावित केला होता. आता या आघाडीत Samsung चा समावेश झाला आहे. यामुळे Vivo, Oppo आणि Xiaomi फोनवरून Samsung फोनवर हाय स्पीड फाईल ट्रांसफर करता येईल.
2019 मध्ये Peer-to-Peer Transmission Alliance मध्ये फक्त Xiaomi, Oppo आणि Vivo अश्या तीनच कंपन्या होत्या. त्यानंतर OnePlus, Realme, Meizu आणि Black Shark सह इतर कंपन्या यात सहभागी झाल्या. त्यानंतर आलेल्या ZTE आणि Asus नंतर आता दक्षिण कोरियातील सॅमसंगचे नाव यात जोडले गेल्यामुळे हि आघाडी मजबूत झाली आहे.
या सर्व मोठमोठ्या कंपन्या एकत्र येण्यामागचे कारण म्हणजे Apple डिवाइसमधील एयरड्रॉप सर्विस. या सर्विसमध्ये अॅप्पलच्या कोणत्याही डिवाइसवरून दुसऱ्या अॅप्पल डिवाइसवर अत्यंत वेगाने फाईल ट्रांसफर करता येते. या सर्व्हिसला गुगुलच्या ‘नियरबाय‘ सर्व्हिसकडून टक्कर मिळते.
या समूहात सहभागी झाल्यानंतर आता सॅमसंग डिवाइसवरून समूहातील इतर कंपन्यांच्या डिवाइसवर 20 एमबीपीएसच्या स्पीडने डेटा ट्रांसफर करता येईल. हि टेक्नॉलॉजीमध्ये डिवाइस पेयर करण्यासाठी ब्लूटूथचा वापर केला जाईल, परंतु डेटा ट्रांसफरसाठी वायफायचा वापर करण्यात येईल.