Samsung लवकरच आपल्या ‘ए’ सीरिजमध्ये नवीन 5G Phone सादर करू शकते. अलीकडेच आलेल्या Galaxy A22 5G स्मार्टफोनची जागा घेण्यासाठी Galaxy A23 5G सादर केला जाऊ शकतो. जुन्या फोनच्या तुलनेत यात अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्स मिळतील. ज्यात 50MP कॅमेरा सेन्सर आणि 5000mAh ची बॅटरी अशा सेन्सर्सचा समावेश असेल.
GalaxyClub नं दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy A23 स्मार्टफोनमध्ये 50MP चा कॅमेरा मिळू शकतो. तसेच या फोनचे 4G आणि 5G असे दोन व्हेरिएंट बाजारात येतील. सॅमसंग Galaxy A23 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल. याव्यतिरिक्त Galaxy A23 स्मार्टफोनची इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु कंपीनी मिडरेंजमध्ये 5G स्मार्टफोनचा समावेश करणार आहे हे स्पष्ट झालं आहे.
याआधी आलेल्या Samsung Galaxy A22 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A22 5G मध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 3.1 मिळतो. कंपनीने या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट दिला आहे. या फोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबीपर्यंतची स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A22 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए22 5जी फोन 5,000एमएएच बॅटरी आणि 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे.