Samsung दरवर्षी Galaxy Unpacked इव्हेंटचे आयोजन करते. या इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टफोन्स, गॅजेट्स तसेच सेवांची घोषणा केली जाते. यावर्षीचा Galaxy Unpacked इव्हेंट 11 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 हे स्मार्टफोन तसेच Buds 2 आणि Watch 4 हे गॅजेट्स लाँच केले जाऊ शकतात. (Samsung Galaxy Unpacked Event Tipped for August 11)
सॅमसंगने ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ इव्हेंट ऑगस्टच्या 11 तारखेला होणार असल्याची घोषणा केली आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून सादर केले जाणारे डिवाइस जगभरातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या तारखांना उपलब्ध होतील. 11 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी Galaxy Unpacked इव्हेंटची सुरवात होईल, हा इव्हेंट कंपनीच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती थेट प्रक्षेपित केला जाईल.
पुढील स्मार्टफोन्सची घोषणा केली जाऊ शकते:
Samsung Galaxy Z Fold 3
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन 7.55-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आणि 6.2- इंचाच्या कवर डिस्प्लेला सपोर्ट करेल. अँड्रॉइड ओएससह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट मिळू शकतो. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 12MP चा मुख्य सेन्सर, 12MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोल्डेबल डिस्प्लेमध्ये 16MP चा अंडर स्क्रीन कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
Samsung Galaxy Z Flip 3
Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ फोल्डेबल अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या मागे असलेले एक्सटर्नल डिस्प्ले आधीच्या तुलनेत मोठा असेल. यावेळी हा डिस्प्ले 1.9-इंचाचा असेल. या स्मार्टफोनच्या रेंडरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. परंतु कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली नाही.
जुन्या Galaxy Z Flip 2 प्रमाणे यात पावर बटण, वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येतील. Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे. Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत 1,400 डॉलर (अंदाजे 1,04,100 रुपये) असू शकते.