नवी दिल्ली, दि. 3 - दक्षिण कोरियन टेक्नॉलॉजी कंपनी सॅमसंगने मोबईल मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन आणला आहे. सॅमसंगने SM- G9298 फ्लिप स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्मार्टफोन संदर्भात मार्केटमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, गेल्या वर्षी सॅमसंगने W2017 फ्लिप फोन लॉन्च केला होता, तो फक्त चीनच्या मोबाईल मार्केटमध्ये विक्री करण्यात आला होता. सॅमसंगच्या नवीन SM- G9298 फ्लिप स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची स्क्रीन 4.2 इंच असून दोन फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, क्वाड कोर स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर सहीत 4 जीबी रॅम आहे. याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी आणि मायक्रो एसडी कार्डची सुविधा दिली आहे. मायक्रो एसडी कार्डच्यामाध्यमातून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येणार आहे. फोटोग्राफीसाठी f/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून फ्रन्ट कॅमेरा 5 मेगापिक्सल देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफनसाठी वायरलेस चार्जिंगची सोय करण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी अनेक फीचर्स आहेत. यामध्ये 4G LTE सहित मायक्रो युएसबी, वायफाय, एनएफसी, ब्ल्यूटुथ आणि जीपीएसचा समावेश आहे. तसेच, 2,300mAh बॅटरी असून कंपनीने दावा केला आहे की, 68 तास स्टॅंडबाय बॅकअप देईल.
काय आहेत फीचर्स...- क्वाड कोर स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर - दोन फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले - 64 जीबी इंटरनल मेमरी - 4 जीबी रॅम - 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा - 2,300mAh बॅटरी