सॅमसंगने भारतीय बाजारात दोन नवीन टॅब्लेट परवडणाऱ्या किंमतीत लाँच केले आहेत. या टॅबचे नाव Samsung Galaxy Tab A9 आणि Tab A9+ आहे. दोन्ही टॅबमध्ये वेगवेगळे प्रोसेसर देण्यात आले आहेत. सॅमसंगने इथे मात्र थोडा खेळ केला आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी चार्जिंग अॅडाप्टर दिलेला नाहीय.
म्हणजेच टॅब चार्ज करण्यासाठी तुम्हाला वेगळा चार्जर पैसे मोजून घ्यावा लागणार आहे. म्हणजेच या टॅबची किंमत ११०० ते १५०० रुपयांनी वाढणार आहे. Samsung Galaxy Tab A9 आणि Tab A9+ च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत 12999 रुपये आहे.
टॅब A9 सिंगल स्टोरेज आणि व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर टॅब A9+ दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. Samsung Galaxy Tab A9 4GB + 64GB स्टोरेज प्रकारात येतो. यात WiFi + LTE आणि WiFi कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.
A9+ मध्ये ११ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच WQXGA (1920 × 1200 पिक्सल) रिझोल्युशन देण्यात आले आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर व Adreno 619 GPU देण्यात आला आहे. 5MP फ्रंट कॅमेरा, 8Megapixel रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 7040mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy Tab A9 4GB + 64GB LTE+wifi 12,999Samsung Galaxy Tab A9 4GB + 64GB Wifi 15,999Samsung Galaxy Tab A9+ 4GB + 64GB 5G 22,999Samsung Galaxy Tab A9+ 8GB + 128GB wifi 20,999
A9 मध्ये 8.7-inch LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek Helio G99 प्रोसेसर असून Mali G57 GPU देखील आहे. 8MP रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सल फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. 5100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.