शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

अब्जावधी असेच मिळवून देणाऱ्या सॅमसंगने गुगलची साथ सोडली; Apple ही त्याच मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 14:11 IST

जगभरात दबदबा असलेल्या सर्च इंजिन गुगलवर आता संक्रांत कोसळणार आहे. गुगलचे आता वाईट दिवस सुरु झाल्याचीच ही नांदी आहे.

जे हवे ते चुटकीसरशी तुमच्या समोर आणून हजर करणाऱ्या, जगभरात दबदबा असलेल्या सर्च इंजिन गुगलवर आता संक्रांत कोसळणार आहे. गुगलचे आता वाईट दिवस सुरु झाल्याचीच ही नांदी आहे. कारण काहीही न करता असेच अब्जावधी रुपये कमवून देणारी जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग आणि अ‍ॅपलने गुगलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

सॅमसंग आणि अ‍ॅपलच्या स्मार्टफोनवर बायडिफॉल्ट गुगल सर्च इंजिन दिले जात होते. यामुळे गुगलला यातून वर्षाला मोठी कमाई होत होती. परंतू आता मायक्रोसॉफ्टच्या एआय बेस्ड सर्च इंजिन Microsoft Bing चा बोलबाला सुरु झाल्याने गुगलची ही कमाई जाणार आहे. हे सर्च इंजिन गुगलपेक्षा चांगले आहे. यामुळे सॅमसंगने गुगलची साथ सोडून सर्व स्मार्टफोनमध्ये बिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. 

एकट्या सॅमसंगच्या स्मार्टफोनद्वारे गुगलला वर्षाला ३ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळत होते. यामुळे गुगलचे सर्वात मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर जर अ‍ॅपलनेही बिंग सर्च इंजिन देण्यास सुरुवात केली तर गुगलचे हे नुकसान वाढून वर्षाला २० अब्ज डॉलरचे होणार आहे. 

गुगलने काळाची पावले उचलून एआय बेस्ड सर्च इंजिनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, तोवर जर बिंगने बाजी मारली तर पुन्हा गुगलला आपला हिस्सा मिळविणे कठीण जाणार आहे. यासाठी गुगलने मॅगी या प्रोजेक्टवर काम सुरु केले आहे. गुललचा वर्षाचा एकूण व्यवसाय हा १६२ अब्जांचा होता. त्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

टॅग्स :googleगुगलsamsungसॅमसंग