टेक दिग्गज कंपनी Samsung चा Galaxy A52S 5G स्मार्टफोन आज भारतात दाखल होणार आहे. दरम्यान कंपनीच्या अजून एका 5G फोनची माहिती समोर आली आहे. कंपनी लवकरच A-सीरीजमध्ये अजून एक किफायतशीर 5G फोन सादर करू शकते. GalaxyClub.nl ने दिलेल्या माहितीनुसार हा फोन Galaxy A13 5G नावाने सादर करण्यात येईल. साहजिकपणे हा फोन कंपनीच्या सध्याच्या सध्या उपलब्ध स्वस्त 5G फोन Galaxy A22 पेक्षा स्वस्त असेल. त्यामुळे हा सॅमसंगचा मोस्ट अफोर्डेबल 5G फोन असेल, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
Samsung Galaxy A13 5G कधी सादर केला जाईल, या फोनमध्ये कोणता प्रोसेसर असेल इत्यादी माहिती या रिपोर्टमधून समोर आली नाही. या रिपोर्टमध्ये फक्त गॅलेक्सी ए13 5जी चा मॉडेल नंबर SM-A136B असेल एवढे सांगण्यात आले आहे. तसेच हा फोन 200 युरोच्या आसपासच्या किंमतीत सादर केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 17,200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.
अलीकडेच आलेल्या Samsung Galaxy A12 चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy A12 मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी डिस्प्ले दिला आहे. हा ‘व्ही’ नॉच असलेला डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशयोसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 850 चिपसेटसह बाजारात सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 512जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे. हा सॅमसंग फोन Android 11 वर आधारित One UI वर चालतो.
Galaxy A12 Nocho स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.