गुगलने (Google) आजपासून कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) करणारे सर्व Android Apps बंद केले आहेत. युजर्सची प्रॉयव्हसी लक्षात घेता गुगलने हा निर्णय घेतला आहे. Call Recording करणारे अॅप्स एक्सेबिलीटी API चा वापर करतात. यामुळे अॅप्सना अनेक प्रकारे परवानगी मिळते. याचा वापर चुकीच्या पद्धतीने अनेक डेव्हलपर्स करतात, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, Call Recording करणारे Android Apps बंद झाले म्हणजे, याचा अर्थ असा नाही की. हे फीचर बंद होत आहे. ज्या स्मार्टफोन्समध्ये पहिल्यापासून हे फीचर उपलब्ध आहे, ते वापरू शकतात. सध्या जास्तकरून स्मार्टफोन्स या फीचरसोबत मार्केटमध्ये येत आहेत.
म्हणजेच तुम्ही फोनच्या इनबिल्ट फीचरचा वापर करून आता Android स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डिंग करू शकता. हे फीचर Xiaomi/ Redmi/ Mi च्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा देण्यात आले आहे. फोन आल्यानंतर तुम्ही रेकॉर्डच्या ऑप्शनवर क्लिक करून कॉल रेकॉर्ड करू शकता. Samsung सुद्धा आपल्या OneUI सोबत कॉल रेकॉर्डिंगचे फीचर युजर्सला देत आहे. तुम्ही तुमच्या Samsung Galaxy स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट फीचरद्वारे कॉल रेकॉर्ड करू शकता. अशाप्रकारे कॉल Oppo, Poco, OnePlus, Realme, Vivo, Tecno आणि इतर स्मार्टफोन्सवर कॉल रेकॉर्ड करू शकता.
दुसऱ्या फोनद्वारे रेकॉर्ड करू शकता कॉलजर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डर दिले नाही, तरीही तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला दुसऱ्या स्मार्टफोनची आवश्यकता भासेल. तुम्ही स्पीकरवर बोलून दुसऱ्या फोनच्या व्हॉइस रेकॉर्डर अॅपद्वारे कॉल रेकॉर्ड करू शकता. दरम्यान, यामध्ये आवाज क्लिअर येत नाही, काही अडचणी येऊ शकतात. मात्र, इनबिल्ट कॉल रेकॉर्डर नसल्यामुळे ही पद्धत कामी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी अॅपद्वारे कॉल रेकॉर्ड करु शकणार नाही.