Samsung Smartphone: सॅमसंगची अपकमिंग फ्लॅगशिप Galaxy S24 सीरीजची खूप चर्चा होत आहे. iPhone 15 नंतर ग्राहक Samsung च्या S24 सीरीजची वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra 17 जानेवारी रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केले जाऊ शकतात. याशिवाय सॅमसंगने Galaxy Z Fold 7 आणि Galaxy S25 मॉडेलच्या ट्रेडमार्कसाठीही अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांत कंपनीने एआर ग्लासेस आणि स्मार्ट रिंग्स सारख्या नवीन उत्पादनांसाठीही अर्ज केला आहे.
Galaxy S24 AI फोन असेलरिपोर्ट्सनुसार, कंपनीचे संपूर्ण लक्ष AI वर असल्याची माहिती आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की, Galaxy AI एक्सपेरियन्स देईल. S24 सीरीज लॉन्चिंगच्या वेळी याची तपशीलवार माहिती समोर येईल.
डच वेबसाइट Galaxy Club ला अनेक देशांमध्ये अॅप्लिकेशन्स सापडले आहेत, त्यापैकी एक सूचित करतो की, Galaxy S24 AI फोन म्हणून लॉन्च केला जाईल. ब्रँडने एआय फोन आणि एआय स्मार्टफोन सारख्या शीर्षकांसाठी ट्रेडमार्क नोंदणीकृत केले आहेत. यावरुनच कंपनीने AI वर लक्ष केंद्रित केल्याचे कळते.
सॅमसंगने ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस व्यतिरिक्त टेलिव्हिजन, स्मार्टफोन स्क्रीन आणि मॅजिक पिक्सेल, फ्लेक्स मॅजिक आणि फ्लेक्स मॅजिक पिक्सेल यांसारखी नावे आणि लोगो असलेल्या इतर उत्पादनांसाठीही ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हा संकेत आहे की, AI Galaxy S24 सीरीजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.