Samsung ने चीनमध्ये Samsung W22 5G फोल्डेबल फोन लाँच केला आहे. हा फोन Galaxy Fold 3 5G स्मार्टफोनचा रिब्रँड व्हर्जन आहे. यात 7.6-इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले, 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, Snapdragon 888 चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. चला जाणून घेऊया Samsung W22 5G स्मार्टफोनची किंमत आणि फीचर.
Samsung W22 5G ची किंमत
Samsung W22 5G स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये 16,999 CNY (सुमारे ₹ 1,98,800) ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.
Samsung W22 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung W22 5G स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. एक कव्हर स्क्रीन आणि फोन उघडल्यावर मिळणारी मोठी मुख्य स्क्रीन. मोठया मुख्य स्क्रीनवर कंपनीने अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला आहे, त्यामुळे व्हिडीओ किंवा कंटेंट बघताना कॅमेरा कटआऊटचा व्यत्यय येत नाही. या फोनमध्ये 7.6 इंचाचा QXGA+ डायनॅमिक AMOLED मुख्य डिस्प्ले आणि 6.2 इंचाचा एचडी+ डायनॅमिक AMOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे. हे दोन्ही डिस्प्ले 10 ते 120Hz पर्यंतच्या अॅडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.
सॅमसंग W22 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 512GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयूआयवर चालतो. या थर्ड जनरेशन सॅमसंग फोल्डेबल फोनमध्ये 4,400एमएएचची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
या फोल्डेबल फोनमध्ये एकूण 5 कॅमेरे आहेत. W22 5G च्या बॅकपॅनलवरील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 12 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या कव्हर डिस्प्लेवर 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंगच्या या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या मुख्य डिस्प्लेच्या डावीकडे 4 मेगापिक्सलचा अंडर डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे.