शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स

By शेखर पाटील | Published: December 18, 2017 12:26 PM

सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात लास-वेगास येथे आयोजित करण्यात येणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो म्हणजेच सीईएसमध्ये बहुतांश कंपन्या आपापल्या नवीन उपकरणांचे अनावरण करत असतात. या अनुषंगाने सॅमसंग कंपनीतर्फे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स सीईएसमध्ये सादर करण्यात येतील, अशी माहिती अलीकडेच लीक झाली होती.

यातून या आगामी मॉडेल्सचे फीचर्सदेखील जगासमोर आले होते. तथापि, दक्षिण कोरियातून आलेल्या नवीन विश्‍वासार्ह सूत्रांनुसार सॅमसंग कंपनी सीईएसऐवजी बार्सीलोना शहरात फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. अ‍ॅपल आणि सॅमसंग कंपनीत नेहमी रस्सीखेच सुरू असते. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आयफोन-एक्स मॉडेलला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता सॅमसंगने याला टक्कर देण्यासाठी गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन स्मार्टफोन्स बाजारपेठेत उतारण्याची तयारी केल्याचे मानले जात आहे.

सॅमसंग कंपनीला आपल्या गॅलेक्सी नोट ७ च्या अपयशामुळे मोठा धक्का बसला होता. यामुळे या कंपनीच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह लागले होते. यानंतर मात्र गॅलेक्सी एस८ आणि गॅलेक्सी एस८ प्लस या मॉडेल्सच्या यशामुळे कंपनीची गाडी पुन्हा रूळावर आली आहे. याचीच पुढील आवृत्ती असणार्‍या गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या दोन्ही मॉडेल्सकडूनही कंपनीला खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, आजवर विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आलेल्या फीचर्सनुसार गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या मॉडेल्समध्ये अनुक्रमे ५.६ अथवा ५.७ आणि ६.१ इंच आकारमानांचे सुपर अमोलेड इन्फीनिटी डिस्प्ले असतील. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा नवीन प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. यात ६ जीबीपर्यंत रॅम तर १२८ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय असतील. यात ड्युअल कॅमेरा सेटअप असून हे मॉडेल्स अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत प्रणालींवर चालणारे असतील अशी शक्यता आहे.( गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लसचे लीक्सच्या माध्यमातून समोर आलेले छायाचित्र) 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानsamsungसॅमसंगMobileमोबाइल