नवी दिल्ली : सोशल मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’च्या प्रायव्हेसी पॉलिसीमुळे काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. आता सरकारनेच या ॲपला पर्याय विकसित केला आहे. ‘संदेस’ या नावाने ‘नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटर’ने सरकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्यांसाठी इंस्टंट मेसेजिंग सिस्टीम तयार केली आहे. कोणत्याही अँड्रॉईड किंवा आयओस यंत्रणेवर आधारित स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड करून वापरता येणार आहे. सध्या ते केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित आहे. हे ॲप सर्वसामान्यांना खुले झाले की याची व्हॉट्सॲपला मोठी टक्कर असणार आहे.कसे वापरायचे?मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी टाकून ॲपचा वापर करता येऊ शकतो.सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रमाणिकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना ‘व्हॉट्सॲप’ वा इतर मेसेजिंग ॲपपासून दूर करण्यासाठी या अॅपचा सध्या वापरकाय आहेत सुविधा?व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलचीदेखील सोय.ऑटो डिलिटचा एक विशेष पर्याय. इतर ॲपमध्ये डिसअपिअरिंग मेसेजचे फिचर आहे. काही विशिष्ट संदेश ‘गोपनीय’ म्हणून मार्क करण्याचीही सोय.ग्रुप्स तयार करणे शक्य.ऑफिशियल ग्रुपसाठी २०० जणांची मर्यादानॉन ऑफिशियल ग्रुपची ५० जणांची मर्यादाब्रॉडकास्ट मेसेजचीही सोय. सध्या १० जणांचा ब्रॉडकास्ट ग्रुप शक्य.डॉक्युमेंट्स, फोटो, व्हिडिओ तसेच ऑडिओही पाठवता येतात.ॲपचे नियंत्रण सरकारच्या ‘एनआयसी’कडे.भारताबाहेरील वापरकर्तेही ॲप वापरू शकतात.सरकारच्या इतर यंत्रणा किंवा योजनांची माहिती मिळविण्यासाठी चॅटबोट सेवादेखील उपलब्ध.वेब व्हर्जनचा पर्याय ‘संदेस’चे वेब व्हर्जनही उपलब्ध आहे. त्यासाठी लाॅगिनची प्रक्रिया वेगळी आहे. व्हाॅट्सॲपवर क्यूआर काेड स्कॅन करून वेब व्हर्जन वापरता येते. मात्र, ‘संदेस’मध्ये लाॅगिनचा पर्याय सध्या देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सर्व चॅट्स ‘एंड टू एंड’ ‘इनक्रिप्टेड’ आहेत.
‘व्हॉट्सॲप’ला ‘संदेस’ची टक्कर; ऑटो डिलिट फिचर ठरणार हटके
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:38 AM