शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

लग्नाचा किंवा मित्रांचा वाढदिवस विसरता? आता नो टेन्शन; WhatsApp चं Message Schedule 'अशी' करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 4:27 PM

WhatsApp Message Schedule : काही जण लग्नाचा किंवा मित्राचा वाढदिवसही विसरतात. पण आता चिंता करू नका कारण यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला मदत करणार आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर आणत असतं. यामुळे बरीच कामं सोपी होत असतात. पण अनेकदा कामाच्या धावपळीत जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगी शुभेच्छा देण्यास आपण हमखास विसरतो. काही जण लग्नाचा किंवा मित्राचा वाढदिवसही विसरतात. पण आता चिंता करू नका कारण यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला मदत करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अधिकृतपणे तुम्हाला कोणतेही फीचर देत नाही. पण तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने हे करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची मदत घ्यावी लागेल. कसं ते जाणून घेऊया.

- सर्वप्रथम, तुम्हाला Google Play Store वरून SKEDit प डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.

- आता तुम्हाला येथे साइन इन करण्यास सांगितले जाईल, तुम्ही Create account वर क्लिक देखील करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही Facebook च्या मदतीने अकाऊंट देखील तयार करू शकता. असे करण्यापूर्वी तुम्ही अटी मान्य कराव्यात.

- तुम्ही साइन इन करताच तुम्हाला या अ‍ॅपमध्ये चार पर्याय दिसतील, त्यापैकी एक व्हॉट्सअ‍ॅप असेल.

- आता WhatsApp वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या DONE वर टॅप करा.

- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर पाच पर्याय दिसतील, येथे तुम्हाला शेड्यूल मेसेजची माहिती मिळेल.

- आता व्हॉट्सअ‍ॅप निवडल्यानंतर, तुम्हाला एनेबल एक्सेसिबिलिटी पॉप अप वर टॅप करावे लागेल.

- आता तुमच्या फोनची सेटिंग्ज ओपन होईल. येथे इंस्टॉल्ड सर्व्हिसेसवर टॅप करा आणि SKEDit वर टॅप करा आणि ते चालू करा. तुम्हाला एक पॉप-अप दिसेल त्याला परवानगी द्या.

- तुमच्या समोर एक स्क्रीन उघडेल जिथून तुम्ही मेसेज शेड्यूल करू शकता.

- येथे TO सेक्शनमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीसाठी मेसेज शेड्यूल करत आहात त्याचं नाव टाका. पॉप-अप स्वीकारा. तुम्ही ओके केल्यावर लगेच व्हॉट्सअ‍ॅप उघडेल, तुम्हाला ज्याला इथे मेसेज करायचा आहे त्यावर टॅप करा, त्याचे नाव SKEDit अ‍ॅपवरील TO सेक्शनमध्ये दिसेल.

- आता वेळ, तारीख यासारखे डिटेल्स सिलेक्ट करून वर दिलेल्या उजव्या चिन्हावर टॅप करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान