शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

स्क्रीन तुमच्या आयुष्यातला व्हिलन आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 9:08 AM

संध्याकाळी घरी आल्यावर विरंगुळा हवा म्हणूनही स्क्रीन्स लागतातच !

हल्ली सकाळी उठल्या उठल्या अंथरूणातून बाहेर पडण्याच्याही आधी पहिली गोष्ट तुम्ही काय करता?- अर्थात, फोनवर नजर टाकता. रिमांइण्डर्स असतात, मेसेजेस बघावे लागतात, व्हॉट‌्सॲपवर शेकडो ग्रुप्स असतात, शिवाय फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं फीड बघायचं असतं ते वेगळंच. हे फक्त सकाळीच नव्हे, दिवसभर चालूच राहातं. शिवाय सकाळी सगळं आवरून ऑफिस सुरू झालं की कामाचा स्क्रीन डोळ्यासमोर येतो. फोन्स सुरू होतात. मग दिवसभर तो रगाडा चालतो. हातातला छोटा स्क्रीन, समोर कामाचा मोठा स्क्रीन..

संध्याकाळी घरी आल्यावर विरंगुळा हवा म्हणूनही स्क्रीन्स लागतातच ! आधी टीव्ही होता, व्हिडिओ गेम्स होते, आता ओटीटी आलंय त्यात भर म्हणून! एकुणातच आपण जागे असतो, त्यातला बराच काळ या स्क्रीन्सच्या गुलामगिरीला जुंपलेलो असतो, हे सध्या सगळ्यांनाच जाणवतं आहे. नुसतं जाणवतंच काय, आता तर ते टोचायलाही लागलं आहे. आपण सतत स्क्रीनसमोर असतो, फोन सोबत नसेल, डिस्चार्ज झाला असेल, घरातलं वायफाय डाऊन असेल तर आपल्याला सहन होऊ नये अशी अस्वस्थता येते, हेसुद्धा आता अनेकांच्या लक्षात यायला लागलं आहे आणि हे योग्य नव्हे याची जाणिवही नाही म्हटलं तरी मन कुरतडतेच आहे की!

महत्त्वाचं म्हणजे सध्या आपलं बाकी कशात लक्ष लागत नाही. मित्रमैत्रिणींबरोबर गप्पांचे कट्टे रंगायचे पूर्वी. आता त्या कट्ट्यावरही मोबाइल हा व्हिलन झाला आहे. घरात एकमेकांच्या समोर बसलेली माणसं एकमेकांच्या हातातल्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसून जी व्यक्ती आता तिथे नाही तिच्याशी व्हर्च्युअली बोलण्यात दंग आहेत, अशी कार्टून्स पूर्वी यायची; पण आता व्यंगचित्रकारांनाही त्यात काही गंमत दिसत नाही कारण पूर्वीचं व्यंग आता वास्तव होऊन बसलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जगभरच्या मनोरंजनाचा एवढा धबधबा आणून घरात ओतणं सुरू केलंय की आपण सगळे वाहूनच गेलो आहोत त्यात!

खूप दिवसात आपण प्रिय माणसाबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या नाहीत, खूप दिवसात झपाटल्यासारखं एखादं पुस्तक दोन रात्रीत संपवलं नाही, स्वत:शीच एकटे निवांत बसलो नाही, याची हुरहुर लागलीय का तुम्हाला?  तर मग तुम्ही एका व्यसनात अडकला आहात. डिजिटल व्यसन!.. आणि तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची फार गरज आहे. म्हणजे काय? त्यासाठी काय करावं लागेल? - त्याबद्दल पुढच्या गुरुवारपासून, इथेच, याच पानावर!

टॅग्स :technologyतंत्रज्ञान