नवी दिल्ली - सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते. मात्र मोबाइल हरवल्यास त्यातील माहिती आणि व्हॉट्सअॅपवरील डेटा चुकीच्या माणसांच्या हाती पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन हरवल्यास तुम्हाला काही बाबतीत खबदरारी घेण्याची गरज आहे. ज्यामुळे किमान तुमचा व्हॉट्सअॅप डेटा चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागण्यापासून सुरक्षित राहील. त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा कुणी गैरवापर तर करू शकणार नाही ना हे निश्चित करा. कुणी अन्य व्यक्ती हरवलेल्या मोबाइलमधून तुमचे व्हॉट्स अॅप ऑपरेट करत असेल तर ते तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरू शकते. जर असं झालं तर खबरदारी म्हणून हे उपाय करावेत. 1 - सर्वप्रथम तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरला फोन करून तुमचे सीमकार्ड डिअॅक्टिव्हेट करायला सांगा. त्यानंतर तुम्ही त्याच क्रमांकासह दुसरे सिमकार्ड वापरू शकता. - एकदा का तुमचे सीमकार्ड डीअॅक्टिव्हेट झाले की तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप दुसऱ्या डिव्हाइसवरून वापरू शकता. तसेच त्याच क्रमांकासह दुसरे सिमकार्ड वापरू शकता. 3 - तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही व्हॉट्सअॅप टीमशी मेलद्वारे संपर्क साधू शकता. या मेलमध्ये Lost/stolen: Deactivate my account हा मेसेज टाइप करून तुमचा फोन क्रमांक आणि देशाचा कोड नंबर लिहावा. त्यानंतर व्हॉट्स अॅप टीम तुमचे अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करेल. तुमच्या मोबाइल हँडसेटमध्ये सिमकार्ड नसले तरी वाय-फायच्या मदतीने तुम्ही व्हॉट्स अॅप सुरू करू शकता, मात्र त्यासाठी व्हॉट्स अॅप टीमशी कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आहे.
मोबाइल हरवल्यास अशाप्रकारे सुरक्षित करा तुमचा WhatsApp डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 5:42 PM