शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लेनोव्होच्या लॅपटॉपची मालिका

By शेखर पाटील | Published: July 22, 2017 3:45 PM

लेनोव्हो कंपनीने आपल्या योगा व आयडियापॅड या मालिकेतील लॅपटॉपची नवीन मालिका भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात एकंदरीत सात मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत.

लेनोव्हो कंपनीने आपल्या योगा व आयडियापॅड या मालिकेतील लॅपटॉपची नवीन मालिका भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात एकंदरीत सात मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत.लेनोव्होने अलीकडेच थिंकपॅड या मालिकेतील मॉडेल्स भारतीय ग्राहकांना सादर केले होते. आता योगा मालिकेतील योगा ७२० व ५२० (मूल्य अनुक्रमे ७४,५०० व ३९,६०० रूपये ) तर आयडियापॅड मालिकेतील आयडियापॅड ७२०एस, ५२०एस व ३२०एस हे मॉडेल्स (मूल्य अनुक्रमे ७४,८५०, ४७,४५० व ३४,७५० रूपये ) तर आयडियापॅड ५२० व ३२० (मूल्य अनुक्रमे ४२,४०० व १७८०० रूपये )उपलब्ध करण्यात आले आहे. योगा ७२० आणि योगा ५२० हे दोन्ही कन्व्हर्टीबल या प्रकारातील मॉडेल्स आहेत. अर्थात ते लॅपटॉप आणि टॅबलेट म्हणून वापरता येणार आहेत. यात सातव्या पिढीतला अत्यंत गतीमान असा कोअर आय-७ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तर यात एक टेराबाईटपर्यंत स्टोअरेज असेल. दोन्हीत फुल एचडी क्षमतेचे डिस्प्ले, फिंगरप्रिंट स्कॅनर, एनव्हिआयडीआयए ग्राफीक कार्ड आदी महत्वाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. सुश्राव्य ध्वनीचा आनंद घेण्यासाठी योगा ७२० या मॉडेलसोबत डॉल्बी ऑडिओ प्रिमीयम तंत्रज्ञानासह जेबीएल स्पीकर्स तर योगा ५२० या मॉडेलसोबत हर्मन स्पीकर्स देण्यात आले आहेत. यात लेनोव्हो अ‍ॅक्टीव्ह पेन हा स्टायलस पेनदेखील वापरण्याचा पर्याय ग्राहकाला देण्यात आला आहे. याच्या मदतीने स्केचींगसह नोट काढण्याचे काम अतिशय दर्जेदार व सुलभ पध्दतीने करण्यात येईल.आयडियापॅड ७२०एस, ५२०एस आणि ३२०एस हे मॉडेल्स अतिशय हलके आणि सुबक डिझाईनयुक्त आहेत. डॉल्बी अ‍ॅटमॉससह जेबीएल स्पीकर्स प्रदान करण्यात आले आहेत. यात अतिशय उत्तम दर्जाचा ब्लॅकलिट कि-बोर्ड प्रदान करण्यात आला असून तो विलग करून वापरण्याची सुविधादेखील यात आहे. सध्या व्हिडीओचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अर्थात यामुळे बॅटरीदेखील मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. नेमकी ही बाब लक्षात घेत यामध्ये सात तासांचा व्हिडीओ बॅकअप असणारी बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर आयडियापॅड ५२० आणि ३२० हे मॉडेल्स मल्टीमिडीया वापराला डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आले आहेत. दोन्ही एनव्हिआयडीआयए जीफोर्स ९४०एमएक्स ग्राफीक्स कार्ड असेल. यापैकी आयडियापॅड ५२० मध्ये हरमन आडिओ तर ३२०मध्ये डॉल्बी ऑडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे सर्व मॉडेल्स विंडोज १० या प्रणालीवर चालणारे असतील. तर यात वाय-फाय व युएसबी टाईप-सी आदी फिचर्सचा समावेश असेल.