आयफोन आपल्या वापरकर्त्यांसाठी प्रत्येक वर्षी नवीन व्हेरियंट लाँच करत असते. Apple ने आपल्या यूजर्ससाठी यावर्षी iPhone 16 सीरीज आणणार आहे. यूजर्सही या सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनी या वर्षाच्या अखेरीस वापरकर्त्यांसाठी AI फिचर देखील देणार आहे. Apple ने काही दिवसापूर्वीच AI सूट Apple Intelligence ची घोषणा केली. आयफोन व्यतिरिक्त iPad आणि Mac वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स आणले जात आहेत.
तर दुसरीकडे यामुळे Apple यूजर निराश होऊ शकतात. Apple iOS 18 आणि macOS Sequoia मध्ये देण्यात आलेल्या AI फिचर विनामूल्य वापरली जाणार नाहीत. या फिचरसाठी कंपनी आपल्या वापरकर्त्यांकडून सुमारे २० डॉलर म्हणजेच १६८० रुपये दरमहा आकारू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, एआय तंत्रज्ञान मोठ्या खर्चाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत कंपनी हा खर्च वापरकर्त्यांकडून वसूल करू शकते. मात्र, कंपनीकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण कंपनी एआय अॅप्ससाठी ग्राहकांकडून पैसे घेऊव शकते. ॲपलच्या या निर्णयामागील कारण स्पर्धक कंपन्यांकडून AI फिचरसाठी घेतले जाणारे शुल्क असू शकते.
कंपनी आपल्या यूजर्संना AI One प्लॅन ऑफर करत आहे. Google Gemini AI आणि इतर अॅप्सचे भाडे २,००० रुपये मासिक आहे. कंपनी पहिल्या टप्प्यात एआय फिचर विनामूल्य देत आहे.